कोल्हापुर - रिझर्व्ह बँकेने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) निर्बंध घालत बँकेचे सर्व व्यवहार थांबविले आहेत. आरबीआयने कलम '35 अ' अंतर्गत पुढील ६ महिन्यांसाठी पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांची चिंता वाढली आहे.
हे ही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले
पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार अचानक ठप्प झाल्याने कोल्हापुरात बँकेसमोर ग्राहकांनी गर्दी केली. खातेधारकांना आपल्या खात्यातून फक्त एक हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरबीआयने निर्बंध घातल्याने पीएमसी बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नवीन कर्ज देणे, बँकेत डिपॉझिट असे व्यवहार पुढील सहा महिने करता येणार नाही.