कोल्हापूर - रामदास आठवले यांनी आज (12 ऑगस्ट) पूरग्रस्तांची भेट घेतली. खासदार फंडातील 50 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर आणि सांगलीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये देणार असल्याचे आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी घेतली कोल्हापुरातील पूरग्रस्तांची भेट; 50 लाखांच्या मदतीची घोषणा - खासदार फंडातून 50 लाख मदत
रामदास आठवले यांनी आज(12 ऑगस्ट) पूरग्रस्तांची भेट घेतली. खासदार फंडातील 50 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. विरोधकांनी पूराचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
रामदास आठवले यांनी घेतली कोल्हापुरतील पूरग्रस्तांची भेट
पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसन आराखड्यासाठी पंतप्रधानांना भेटणार असणार असल्याची माहिती आठवले यांनी भेटीदरम्यान दिली. पूरप्रभावित क्षेत्रासाठी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही आठवलेंनी नागरिकांना दिले. विरोधकांनी पूराचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.