महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजू शेट्टींचे नाव 'त्या' यादीतून वगळले? कार्यकर्ते म्हणतात 'संघटनेशी पंगा महागात पडेल' - राज्यपाल

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'आमच्या संघटनेला हलक्यावर घेऊ नका. आमच्याशी पंगा घेणे आपल्याला चांगलेच महागात पडेल' असा इशारा स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Sep 3, 2021, 2:28 PM IST

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'आमच्या संघटनेला हलक्यावर घेऊ नका. आमच्याशी पंगा घेणे आपल्याला चांगलेच महागात पडेल' असा इशारा स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे 'त्या' 12 जणांच्या नावावरून चांगलाच वाद उफळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी सुद्धा समझोत्यानुसार राष्ट्रवादीने आम्हाला जागा देणे, ही त्यांची जबाबदारी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतंय? ते पाहावे लागणार आहे.

स्वाभिमानी संघटनेचे नेते

'आयत्या वेळेला नाव वगळले तर परिणाम भोगावे लागतील'

या नवीनच वादामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय आम्हाला आधी आश्वस्त करायचे आणि आता आयत्या वेळी जर राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले, तर ज्यांच्यामुळे हे झाले त्यांना भविष्यकाळात मोठे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सुद्धा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

...तर फरक पडणार नाही

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून आता नवीनच चर्चा समोर येत असून शेट्टी यांचे नाव त्यातून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी 'ईटीव्ही भारत'शी बोलले, की 'लोकसभा निवडणुकीपूर्वीच विविध विषयांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी माझी चर्चा झाली होती. त्यावेळी सुद्धा लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात निर्माण झाले. त्यामुळे आमचा ज्या गोष्टीवर समझोता झाला होता, त्यावर राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीला विधानपरिषदेसाठी एक जागा जाहीर केली आहे. त्यावेळी आपण स्वतः बारामती येथे जाऊन शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांनी राजू शेट्टींनी ही जागा स्वीकारावी अशी अट घातली होती. त्यानुसार आम्ही त्यांची भेट घेऊन परतलो होतो. त्यानंतर आजपर्यंत एकदाही या जागेबाबत काय झाले, याची चौकशी आम्ही केली नाही. आम्हाला सध्या त्यामध्ये काहीही रस सुद्धा नाही. सद्या 12 जणांच्या मात्र समझोत्यानुसार विधानपरिषदेची एक जागा द्यायची राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. मात्र नाही दिली तरी आम्हाला फार मोठा फरक पडणार आहे, असेही काही नाही'. 'मात्र सध्या या चर्चा आम्हाला केवळ माध्यमांद्वारे कानावर पडत आहेत. पुढे काय होतंय ते पाहू', असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा -VIDEO : 'बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल'

ABOUT THE AUTHOR

...view details