चुरशीच्या लढतीत राजू शेट्टींवर केली धैर्यशील मानेंनी मात
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभरात चर्चेत होता. गेल्यावेळी महायुतीच्या वतीने निवडणूक लढवून शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. महायुतीच्या तंबूतून बाहेर पडून शेट्टी यांनी महाघाडीशी जवळीक साधून निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने होते. प्रारंभी या लढतीत राजु शेट्टी हे सहजपणे बाजी मरतील असे चित्र होते पण अखेरच्या टप्प्यात त्याला टोकाची कलाटणी मिळाली. माने यांच्यादृष्टिने अनेक घटक पथ्यावर पडली. माने यांची मराठा जात त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा शेट्टी आणि साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक आणि नवमतदारांना माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली त्याचा प्रत्यय आज मतमोजनीवेळी आला.
येथील राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या फेरीचा निकाल शेट्टी यांना दिलासा देणारा ठरला. या फेरीत शेट्टी यांना 104 मतांची अल्पशी आघाडी मिळाली किंबहुना हीच त्यांची एकमेव आघाडी देणारी फेरी ठरली सलामीच्या फेरीत शेट्टी यांना 35 हजार 567 तर माने यांना 35 हजार 463 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी 6984 मते घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला. दुसरी फेरी मात्र शेट्टी यांना धक्का देणारी होती. त्यांना 30 हजार 623 मते मिळाली. तर माने यांनी 33 हजार 820 मते मिळवून मताधिक्य खेचले. दुसऱ्या फेरीअखेर 3 हजारांहून अधिक मताधिक्य मिळविले. त्यांचा प्रत्येक फेरीला मताधिक्य वाढतच राहिले. पाचव्या फेरीवेळी माने यांना 1 लाख 80 हजार तर शेट्टी यांना 1 लाख 45 हजार मते मिळाली होती. 35 हजारांचे मताधिक्य घेतले. हाच क्रम उत्तोरोत्तर वाढत राहिला.
त्यांनतर माने यांनी विजयाच्या दिशेने कुच केल्याचे स्पष्ट जाणवले. निकालानंतर धैर्यशील माने यांनी युवा जनतेने युवा नेतृत्वाला विजयी करून आपल्या मनातील खासदार बनविण्याचे मूर्तिमंत उदाहरण घालून दिले आहे. माझ्या विजयाला सहाय्यभूत ठरलेल्या तरुणांसह समस्थ मतदारांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन. याचवेळी उत्तम लोकप्रतिनिधी कसा असतो हे कृतीतून दाखवून देईन सांगत मानेंनी शेट्टी यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, जनतेला गृहीत धरण्याचा त्यांचा निर्णय चुकला चूकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची कोणती अवस्था होते हे निकालातून मतदारांनीच दाखवून दिले आहे.
४.३० - धैर्यशील माने यांना ४३१८४८ मते मिळाली असून राजू शेट्टी यांना ३४५७९५ मते मिळाली आहेत.
२.३० - राजू शेट्टींच्या मतदान संख्येत वाढ होताना दिसत नाही. ९ व्या फेरी अखेरीस धैर्यशील माने यांना ७२ हजाराची आघाडी
१.३० - धैर्यशील मानेंनी घेतली ५५ हजारांची आघाडी
१२.४५ - राजू शेट्टी पिछाडीवर, धैर्यशील मानेंनी घेतली ४२ हजारांची आघाडी
बहुजन वंचित आघाडीच्या अस्लम सय्यद यांना लक्षणीय मते मिळाली असून शेट्टींना याच गोष्टीचा फटका बसताना दिसतोय.
११.४० - ७ व्या फेरी अखेर धैर्यशील मानेंना १९६७८७ मते, १९,६७८ हजार मतांनी राजू शेट्टी पिछाडीवर आहेत.