महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2019, 2:43 AM IST

Updated : Dec 6, 2019, 3:36 AM IST

ETV Bharat / state

कांदा आयातीचा निर्णय देशातील शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी

'सरकारी काम अन् सहा महिने थांब' अशा प्रवृत्तीच्या काराभारामुळेच सरकारला कांदा आयातीचा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे. शेतकऱ्यांचा कांदा आता बाजारात यायला सुरूवात झाली असताना कांदा आयातीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणार असल्याची टीका राजू शेट्टींनी केली आहे.

raju-shetty-on-onion-import
राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोल्हापूर - कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध दर्शविला आहे. कांद्याचे भाव वाढून 2 महिने झाले आहेत. मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला? असा सवाल त्यांनी केल आहे. सरकारचा हा निर्णय आत्मघातकी आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारा असल्याचे सुद्धा शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सरकारने तुर्कस्तानमधून 11 हजार टन कांदा आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर तर कोसळतील. परिणामी इथल्या शेतकऱ्यांना आपला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येणार आहे. शिवाय या निर्णयाने कोणाचाही फायदा होणार नाहीये. कांदा अशावेळी आयात करत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना तर दिलासा मिळणार नाहीच उलट शेतकऱ्यांचीच वाट लागणार असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

Last Updated : Dec 6, 2019, 3:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details