कोल्हापूर- राष्ट्रवादीच्या संसदीय कामाचे कौतुक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर एक नवे जाळे टाकले आहे. भाजपच्या या जाळ्यामध्ये राष्ट्रवादीने फसू नये, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीने भाजपच्या जाळ्यात फसू नये - राजू शेट्टी - कोल्हापूर जिल्हा बातमी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर खूप जहरी टीका केली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
हेही वाचा - ...तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही; स्वाभिमानीचा इशारा
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर खूप जहरी टीका केली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शिवाय तुरूंगात टाकण्याचीही भाषा सुद्धा काही नेत्यांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने हे विसरून चालणार नाही. भाजपच्या या जाळ्यात जर राष्ट्रवादी अडकली तर महाराष्ट्रातले स्वाभिमानी नागरिक हे कदापी सहन करणार नाहीत. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटतील, असेही शेट्टी यांनी सांगितले.