कोल्हापूर- राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यावर आता संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारवरती शरसंधान साधल्यावर आता माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजपमध्ये न जाणाऱ्यांवर ईडी आणि प्राप्तिकराचा उपद्रव दिला जात असल्याचे ते म्हणाले. यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.
भाजपमध्ये न जाणाऱ्यांवर ईडी आणि प्राप्तिकर उपद्रव देतात - राजू शेट्टी - amit shaha
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे ईडी आणि प्राप्तिकर हे दोनच सच्चे कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, 'सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे ईडी आणि प्राप्तिकर विभाग हे दोनच सच्चे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. जे लोक त्यांच्या पक्षांमध्ये येत नाहीत त्यांना ते ईडी आणि प्राप्तिकर विभागामार्फत उपद्रव देतात. शिवाय ज्यावेळी आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री होते त्यावेळेस ईडी आणि प्राप्तिकर विभागाने छापा का टाकला नाही? त्यांना आत्ताच छापा टाकावासा का वाटला?' हे प्रश्न उपस्थित करून हे न सुटणारे कोडे आहे, असे शेट्टी म्हणाले.