महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोक्यात राग न घालता पराभवाचे आत्मचिंतन करूया; राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना आवाहन - loksabha

या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ज्यांनी माझ्यासोबत पायाला चिंध्या बांधून अपार कष्ट केले त्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/24-May-2019/3370166_shetty.mp4

By

Published : May 24, 2019, 11:56 AM IST

कोल्हापूर- डोक्यात राग न घालता पराभवाचे आत्मचिंतन करूया, असे आवाहन हातकणंगलेचे पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ज्यांनी माझ्यासोबत पायाला चिंध्या बांधून अपार कष्ट केले त्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते यावेळी म्हणाले.

या निवडणुकीत माझा झालेला पराभव हा मला मान्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तुम्ही नाराज होऊ नका, मी तुमच्यावर संस्कार केले आहेत. त्यामुळे त्या संस्कारांची जाण ठेवून तुम्ही डोक्यात राग न घालता या पराभवाचे आपण आत्मचिंतन करूया, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. राजू शेट्टी यांना शिवसेनेचे नवख्या उमेदवार धैर्यशील माने यांच्याविरोधात मोठ्या मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शेट्टींनी आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

स्वाभीमानचे राजू शेट्टी

मिळालेल्या मतांची आकडेवारी -
उमेदवाराचे नाव मिळालेली मते -

  • 1) धैर्यशील माने (शिवसेना) 574077
  • 2) खा.राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी) 480292
  • 3) अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी) 120584
  • 4) राजू मुजिकराव शेट्टी (बहुजन महा पार्टी) 7971

ABOUT THE AUTHOR

...view details