कोल्हापूर -राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प मागील सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षा नक्कीच चांगला आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी म्हणतात... तर अर्थसंकल्पाबाबत अधिक आनंद झाला असता - 'कृषी संजीवनी' योजना
अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
खासदार राजू शेट्टी
हेही वाचा -महा'अर्थ': आरोग्य विभागासासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद
नियमित कर्ज भरणाऱ्यांना 75 हजार रुपये आणि थकीत वीज बिलासाठी 'कृषी संजीवनी' योजना आणली असती, तर अधिक आनंद झाला असता. 1 रुपये 16 पैसे दराने समान वीज आकारणीची घोषणा अर्थमंत्र्यांकडून अपेक्षित होती. मात्र ती यावेळी झाली नाही. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.