कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अनेक तरुण शेतकऱ्यांचे पैसे गुंतले आहेत. अनेकांचे संसार उद्धस्त होऊनही 'महारयत अॅग्रोइंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'तील संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणातील सूत्रधारासह साथीदारांवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा - 'महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
शेतकऱ्यांनी आणि आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांनी थेट सागर खोतवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता तातडीने सागर खोतवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील प्रमोद जमदाडे या तरुणाने मंगळवारी आत्महत्या केली. कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायात गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. शेतकऱ्यांनी आणि आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी थेट सागर खोतवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता तातडीने सागर खोतवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली.
हेही वाचा - मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे
घोटाळा करणारा कितीही मोठा असला तरी त्याच्या मुसक्या आता आवळल्याच पाहिजेत. नाहीतर पोलिसांच्या आणि एकूणच सरकारच्या वर्तनाबद्दल संशय घ्यायला कुठेतरी जागा निर्माण होईल, असेही शेट्टी म्हणाले.