कोल्हापूर - गेले अनेक दिवस मी सांगत आहे, आपली चळवळ टिकली पाहिजे. माझी जागा घेणारा तगडा माणूस जर मिळाला तर या जगातील सर्वात आनंदी माणूस मी असेन, आनंदाने बाजूला जायला तयार असल्याची भावनीक साद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. शेट्टी जयसिंगपूर येथे आयोजित 18 व्या ऊस परिषदेत बोलत होते.
राजू शेट्टी ऊस परिषदेत बोलताना हेही वाचा - अजित पवारांनी चूक विसरून परत यावे - अशोक चव्हाण
राजू शेट्टी यांच्या लोकसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद आयाजित केली होती. यावेळी संघटनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आणि इतर यावेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, या ऊस परिषदेत ऊसाला प्रतिटन एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावे अशी प्रमुख मागणी आपण सरकारकडे करत आहोत. या मागणी बरोबरच राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एक भावनिक साद घातली. ते म्हणाले, पण आपली ही चळवळ अशीच टिकली पाहिजे. कारण या चळवळीमुळे शेतकऱ्याला जगण्याची एक उमेद मिळाली आहे. चळवळी ने आपल्या सर्वांना खूप काही दिले असल्याचे देखील शेट्टी यांनी यावेळी नमूद केले. विशेष म्हणजे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांच्या डोक्यावर चळवळ टिकली पाहिजे अशा उल्लेखाच्या टोप्या पाहायला मिळाल्या.
हेही वाचा - पवारांनी सुरुवात केली पवारच शेवट करतील - आमदार बच्चू कडू