कोल्हापूर -शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीनुसार ३० सप्टेंबरच्या अखेरपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. मात्र, हे कर्ज गेल्या वर्षीचे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मग या कर्जमाफीचा फायदा कोणाला होणार? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच कर्जमाफीचा फायदा होणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, असेही ते म्हणाले.
'फायदा कोणाला..? कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करा' - शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी
महाराष्ट्रातील सर्वाधिक कर्जवाटप करणाऱ्या जिल्ह्यातून माहिती घेतली असता, एकही जिल्ह्यामध्ये ६०० ते ७०० कोटींच्यावर थकबाकी दिसत नाही. त्यामुळे कर्जमाफीची एकूण रक्कम ७ ते ८ हजार कोटींच्यावर जाणार नाही. कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे? हे सरकारने जाहीर करावे. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम नेमकी किती आहे हे समजेल, असे राजू शेट्टी म्हणाले.
सर्वच भागातील शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साताबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले. अवकाळी पावसामुळे, महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. केवळ कोल्हापूर, सांगलीमध्येच नाहीतर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असा नियम लावला आहे. यामुळे अनेक शेतकरी अपात्र होतील आणि या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही. अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून केलेली कर्जमाफी ही चुकीची असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्वाधिक कर्जवाटप करणाऱ्या जिल्ह्यातून माहिती घेतली असता, एकही जिल्ह्यामध्ये ६०० ते ७०० कोटींच्यावर थकबाकी दिसत नाही. त्यामुळे कर्जमाफीची एकूण रक्कम ७ ते ८ हजार कोटींच्यावर जाणार नाही. कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे? हे सरकारने जाहीर करावे. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम नेमकी किती आहे हे समजेल, असेही शेट्टी म्हणाले.