कोल्हापूर - आरक्षणाचे जनक आणि समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 146 वी जयंती आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राजर्षींची जयंती कोल्हापुरात अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. शासकीय जयंतीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांची १४६ वी जयंती साधेपणाने साजरी - राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरच्या दसरा चौकातील शाहूंचा पुतळा सजविण्यात आला आहे. तर, पालकमंत्री सतेज पाटील आणि इतर राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, महापौर निलोफर आजरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये येऊन मान्यवरांनी शाहुराजांना अभिवादन केले. दरवर्षी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात शाहू जयंती साजरी केली जाते. संपूर्ण शहरात मिरवणुका आणि शोभा यात्रांचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोठे कार्यक्रम टाळण्यात आले आहेत. तर दसरा चौकामध्ये असणारा शाहू महाराजांचा पुतळा सुद्धा सजविण्यात आला आहे.