महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुर- चंद्रकांत पाटलांचे कोल्हापूरातील कर्तृत्व काय? राजेश क्षीरसागरांचा टोला - चंद्रकांत पाटील न्यूज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्यावरून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

राजेश क्षीरसागर
राजेश क्षीरसागर

By

Published : Apr 24, 2021, 4:38 PM IST

Updated : Apr 24, 2021, 4:52 PM IST

कोल्हापूर- भाजपचे चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री असताना त्यांची अकार्यक्षमता जनतेने पाहिली आहे. कोल्हापूरसाठी त्यांचे कर्तृत्व काय? त्यामुळे जनतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. सत्ता गेल्यामुळे भाजप नेते सैरभैर झाल्याचा टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी लगावला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्यावरून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दिलेला शब्द न पाळल्यामुळे भाजप सत्तेबाहेर गेले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांचे नेते सैरभैर झाले आहेत. महाराष्ट्र जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. मंत्र्यांचे राजीनामा मागणे, संभ्रम निर्माण करणे आणि वारंवार भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा करून वातावरण निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत, असे क्षीरसागर म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचे कोल्हापूरातील कर्तृत्व काय?

हेही वाचा-अचानक ऑक्सिजन बंद पडल्याने दोन रुग्णांचा मृत्यू; बीड जिल्हा रुग्णालयातील घटना

अजित पवार यांनी पुण्याची दहावेळा हद्दवाढ केली-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काम करण्याची मोठी ताकद आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी नेमून दिली आहे. ज्या पुण्यातून चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत, त्या पुण्याची अजित पवार यांनी दहावेळा हद्दवाढ केली आहे. महानगरपालिकेसह शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. तर त्या उलट चंद्रकांत पाटील यांनी स्वतःला तपासून घ्यावे. कोल्हापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी कोल्हापूरची हद्दवाढ किती वेळा केली? कोल्हापूरचा विकास काय केला? असा सवाल राजेश क्षीरसागर यांनी केला.

हेही वाचा-अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण?

भाजप नेहमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात,त्यांना मी उत्तर देण्यापेक्षा जनता उत्तर देईल, उगीच बडबड करण्यापेक्षा कृतीतून मुख्यमंत्री आपले कर्तृत्व दाखवून देतात. त्यामुळे जनतेमध्ये या मुख्यमंत्री यांच्याबाबत आपले पनाची भावना आहे, असे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले.

Last Updated : Apr 24, 2021, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details