कोल्हापूर : पन्हाळगडावर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. शनिवारी (4 सप्टेंबर) मध्यरात्री डॉ. राजेंद्र होळकर यांच्या आणखी एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पन्हाळगडावर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
पन्हाळगडावर पुन्हा बिबट्याची दहशत बिबट्याच्या हल्ल्यात आजवर 24 कुत्री ठार
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा खुलेआम वावर सुरू आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने राजाची झोपडी येथे एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत डॉ. राज होळकर यांची २४ कुत्री ठार झाली आहेत. हा प्रकार ताजा असताना पुन्हा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
पन्हाळगड, नेबापुर, बुधवार पेठ, वाघबिळ या ठिकाणी मुक्त वावर असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. चार दिवसांपूर्वी हा बिबट्या बुधवार पेठेत नागरी वस्तीत आला होता.
हेही वाचा -सोलापुरात यंदाही गणपती मिरवणुकीला बंदी, वाचा प्रशासनाचे नियम