महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले अंबाबाईचे दर्शन - Ambabai Darshan

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

राज 1

By

Published : Feb 24, 2019, 10:17 AM IST

कोल्हापूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून (शनिवार) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी ते कोल्हापूर शहरात दाखल झाले आहेत. आज सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

राज ठाकरे आणि सतेज पाटील यांच्यात बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा सुरू होती. मात्र, ही भेट कौटुंबीक असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. डी वाय पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील यांचे नुकतेच लग्न झाले. या लग्नात उपस्थित राहता न आल्याने ते आज भेटण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळी ८ वाजता राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा मंदिर परिसरात दाखल झाला. यानंतर मुख्य गाभार्‍यात जाऊन राज ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. एका खासगी कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे २ दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते पुन्हा मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details