महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा; 2.75 लाखांचा मुद्देमाल जप्त - कोल्हापूर अवैध हातभट्टी दारू निर्मिती

हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकला. मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याच्या 40 डब्यांसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यावेळी 11 हजार 350 लिटर कच्च्या रसायनासह एकूण 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून या कारवाईत एकूण 9 गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

अवैध हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा
अवैध हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा

By

Published : Jun 12, 2020, 8:38 PM IST

कोल्हापूर - राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकला. मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याच्या 40 डब्यांसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यावेळी 11 हजार 350 लिटर कच्च्या रसायनासह एकूण 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून या कारवाईत एकूण 9 गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

कोराना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क, विभागाकडून जिल्ह्यांतील विविध ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीच्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या हातभट्टी दारू अथवा बाजारात अवैध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या देशी, विदेशी तसेच बनावट अथवा परराज्यातील अवैध मद्य सेवन करू नये, असे आवाहन अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे. अशाप्रकारे मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे मद्य प्राशन करण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येण्याची शक्यता असल्याने अशा लोकांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

या कारवाईत अधीक्षक व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर, निरीक्षक भरारी पथक, हातकणंगले, शाहुवाडी, कागल, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी व पोलीस विभागाकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस उपअधीक्षक जयसिंगपूर व हातकणंगले पोलीस अशा 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details