महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, तर उपाध्यक्षपदी जयवंत शिंपी यांची निवड - Election of Kolhapur Zilla Parishad President

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजप आघाडीची सत्ता जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह इतर घटक पक्षांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये 2019 सत्ता आली. त्यावेळी एक वर्षानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष बदल करण्यात येईल यावर निर्णय झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता राहुल पाटील यांची अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्ष पदासाठी जयवंत शिंपी यांची वर्णी लागली आहे. याबाबतची घोषणा ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि उपाध्यक्ष  जयवंत शिंपी
नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि उपाध्यक्ष जयवंत शिंपी

By

Published : Jul 12, 2021, 4:07 PM IST

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी करवीर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. तर, उपाध्यक्षपदासाठी जयवंत शिंपी यांची नावे निश्चित झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणार ग्रामविकासंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांची तर, उपाध्यक्षपदासाठी जयवंत शिंपी यांची निवड झाली. त्याबाबतची घोषणा करताना ग्रामविकासंत्री हसन मुश्रीफ अणि निवडी नंतर प्रतिक्रिया देताना राहुल पाटील आणि उपाध्यक्ष जयवंत शिंपी

शुक्रवार पासूनच महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वच आहे. येथील सदस्य शुक्रवारपासूनच आले होते. रविवारी या सदस्यांमधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व महत्वाचे नेतेही पन्हाळ्यावर उपस्थित होते. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी मुलाखतीदरम्यान अनेकांनी काँग्रेसकडे अध्यक्षपद राहावे याबाबत बोलून दाखवले. तर, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद यावे याबाबत बोलून दाखवले. मात्र, घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शेवटी राहुल पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी तर, जयवंत शिंपी यांची नावे निश्चित झाले. त्याबाबतची अधिकृत घोषणा ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

एक वर्षांनंतर पदाधिकारी बदलाचा निर्णय

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजप आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह इतर घटक पक्षांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणली. 2019 मध्ये गतवेळेची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली होती. त्यावेळी एक वर्षानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी बदल करण्यात येईल यावर निर्णय झाला होता. मात्र, कोरोनामुळे ही निवड प्रक्रिया लांबली होती. आता केवळ 8 महिने कार्यकाल उरला आहे. त्यासाठी ही अध्यक्ष-उपाध्यक्षांती नव्याने निवड झाली आहे.

आमदार प्रकाश आवाडे यांचा राहुल पाटील यांना पाठिंबा

जर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील यांचे नाव असेल, तर आमदार प्रकाश आवाडे गटाचे दोन्ही सदस्य राहुल पाटील यांना पाठिंबा देतील अशी आवाडे यांनी भूमीका घेतली होती. राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी आणि विजय बोरगे यांचे उपाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत होते. शेवटी उपाध्यक्षपदाची माळ शिंपी यांच्या गळ्यात पडली.

महाविकास आघाडी सदस्य संख्याबळ

काँग्रेस - 13, राष्ट्रवादी - 11, शिवसेना - 10, चंदगड विकास आघाडी - 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना - 2, शाहू विकास आघाडी- 2, अपक्ष - 1, एकूण - 41.

ABOUT THE AUTHOR

...view details