कोल्हापूर - जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात जास्त प्रमाणात ज्या धबधब्याला भेट देतात त्या राउतवाडी धबधब्यासहीत सर्वच धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. राधानगरी येथे झालेल्या महसूल, पोलीस, वन व स्थानिक ग्रामस्थांच्या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मान्सून पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार नाही.
कोल्हापूर : यंदा राधानगरी मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद - rautwadi waterfall kolhapur news
राधानगरी तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनोचे रुग्ण आढळले आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही नियंत्रण राहू शकणार नाही. त्यामुळे तालुक्यातील धबधबे, धरणे, अभयारण्य अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झोताच अनेक पर्यटनप्रेमी हे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी भेट देत असतात. जिल्ह्यातील राधानगरी तालुकाही निसर्गप्रेमींमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील सर्व मान्सून पिकनिक पॉईंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. राधानगरी तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोनोचे रुग्ण आढळले आहेत. तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही नियंत्रण राहू शकणार नाही. त्यामुळे तालुक्यातील धबधबे, धरणे, अभयारण्य अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच नियम मोडून कोणी या ठिकाणी आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस व वन खात्यातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटकांना या मान्सूनचा आनंद घेता येणार नाही. दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांना मात्र, याचा आर्थिक फटका बसला आहे. तर, स्थानिक ग्रामस्थांनी या बंदीबद्दल प्रशासनाचे आभार मानले असून प्रशासनाला सहकार्यसुद्धा केले आहे.