महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात पावसाचे थैमान; राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले - कोल्हापूर

राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून प्रतिसेकंद 7112 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरण

By

Published : Aug 1, 2019, 10:09 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले आहे. जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत तर, राजाराम बंधाऱ्याने 41.8 फूट पाण्याची पातळी गाठली आहे.


पावसाच्या जोरदार बॅटिंगने शहरासह जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून प्रतिसेकंद 7112 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सुतार वाडा भागातील 5 कुटुंब आणि 18 लोकांना खबरदारी म्हणून केले स्थलांतरित करण्यात आले आहे. रत्नागिरी राज्यमार्गावरून येणारी वाहतूक वाघबीळ जवळ बंद करून कोडोलीमार्गे वळविण्यात आली आहे तर, कोणत्याही क्षणी कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य रस्त्याची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पडळी आणि पिरळ पुलावर पाणी आले असल्यामुळे राऊतवाडी धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details