महाराष्ट्र

maharashtra

शाहू महाराजांच्या सिंचन, शिक्षण योजनेवर सरकार काम करणार - चंद्रकात पाटील

By

Published : Jun 26, 2019, 1:12 PM IST

Updated : Jun 26, 2019, 1:32 PM IST

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी पावणेआठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

राजर्षी शाहू जयंती सोहळा

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज यांच्या १४५ व्या जयंती सोहळा आज कोल्हापूरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्याचे महसुलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. यावेळी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

राजर्षी शाहू जयंती सोहळा

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची आज १४५ वी जयंती आहे. त्यानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी पावणेआठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसच शाहू जन्मस्थळ आणि परिसराची पाहणी केली. यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी ज्या पद्धतीने शिक्षण आणि पाणी यावर लक्ष केंद्रीत करून सर्वांगीण विकास केला, त्याच धर्तीवर राज्याचा विकास केला जाईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पदवीपर्यंत शिक्षण मोफत करा, या संदर्भात चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी बारावीपर्यंत मुलींचे शिक्षण मोफत आहे तसेच आदीवासी विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मोफत दिले जातात. संभाजी राजेंना नेमके अजून काही अपेक्षित आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राजे एकत्र बसून चर्चा करतील आणि तुमचा प्रश्न मार्गी लागेल, असे महसूलमंत्री पाटील म्हणाले. यावेळी कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Jun 26, 2019, 1:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details