महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऊस आंदोलनाला हिंसक वळण, एक ट्रॅक्टर पेटवला - kolahpur

जोपर्यंत ऊस परिषदेत ऊसदरावर होत नाही तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. कारखान्याला ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर आडविण्यात आले तर एक ट्रॅक्टर पेटवण्यात आला आहे.

पेटलेला ट्रॅक्टर

By

Published : Nov 21, 2019, 9:51 AM IST

Updated : Nov 21, 2019, 10:27 AM IST

कोल्हापूर- कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. दानोळी येथील अथणी शुगर्सला ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर आडवण्यात आले असून १ ट्रॅक्टर पेटविला आहे, तर सहा ट्रॅक्टरमधील हवा सोडण्यात आली आहे.

ऊस आंदोलनाला हिंसक वळण


आळते (ता. हातकणंगले) येथे व्यकंटेश्वरा कारखान्याला जाणाऱ्या दोन ट्रॅक्टरची हवा सोडून ऊसवाहतूक रोखण्यात आली आहे. जोपर्यंत ऊस परिषदेत ऊसदरावर होत नाही तोपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता.

हेही वाचा - खड्डेमुक्त कोल्हापूर बनवणे हाच मुख्य उद्देश - महापौर

Last Updated : Nov 21, 2019, 10:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details