महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरचे कार्यालय दुसरीकडे हलविण्याचा वर्षा उसगावकरांचा डाव; राजेभोसलेंचा गंभीर आरोप - कोल्हापूर चित्रपट महामंडळाचे कार्यालय

अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मनमानी कारभार आणि गैरकृत्य केले असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी कोल्हापुरात कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वर्षा उसगावकर आणि सुशांत शेलार यांच्यावर टीका केली.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Nov 27, 2020, 5:16 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातील चित्रपट महामंडळाचे कार्यालय दुसरीकडे हलविण्याचा वर्षा उसगावकर यांचा डाव आहे. त्यासाठीच त्यांनी गुरुवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचा गंभीर आरोप मेघराज राजेभोसले यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर या सेलिब्रेटिंना महामंडळ लुटायचे आहे -

येत्या 4 महिन्यात चित्रपट महामंडळाचा कार्यकाळ संपत आहे. उरलेल्या या 4 महिन्यात महामंडळ लुटण्याचा वर्षा उसगावकर आणि सुशांत शेलार यांचा डाव असल्याचा गंभीर आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला. शिवाय अनेक संचालकांवर गंभीर आरोप करत हे सर्व महामंडळ लुटण्यासाठीच एकत्र आले असल्याचे मेघराज राजेभोसले यांनी म्हटले आहे.

8 विरुद्ध 4 ने कार्यकारिणीमध्ये अविश्वास ठराव मंजूर -

अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मनमानी कारभार आणि गैरकृत्य केले असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी कोल्हापुरात कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 8 विरुद्ध 4 मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर धनाजी यमकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेत मी गप्प बसणार नाही, बेकायदेशीर झालेल्या ठरावबाबत न्यायालयात धाव घेणार आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details