कोल्हापूर - दरवर्षी कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव पार पाडतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मात्र, भक्तांविनाच यंदाचा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. येत्या 17 तारखेपासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर तयारीला आता वेग आला आहे.
मंदिराच्या कळसाबरोबरच गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण झाली आहे. आता अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता सुरू असून आज सुरुवातील चांदीच्या दागिन्यांसह पालखीला झळाळी देण्याचे काम पार पडले. उद्या याच पद्धतीने सोन्याच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम करण्यात येणार असून लवकरच तयारी पूर्ण होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.