महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2019, 9:54 PM IST

ETV Bharat / state

Exclusive : सत्तेत सहभागी होणार की विरोधी बाकावर बसणार ? पाहा काय म्हणाले नूतन आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजी मतदार संघातून अपक्ष म्हणून लढलेले काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे विजयी झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडून ते या निवडणूकीच्या मैदानात स्वतंत्र उतरले होते.

प्रकाश आवाडे

कोल्हापूर - इचलकरंजीतील प्रश्नांना त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे त्यांना आता ही फळं भोगावी लागत असल्याच्या टोला नूतन आमदार प्रकाश आवाडे यांनी सुरेश हाळवणकर यांना लगावला. शिवाय अपक्ष निवडून आल्याने पुढे सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी बाकावर बसायचे याबाबत कार्यकर्त्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटलं आहे.

प्रकाश आवाडे

इचलकरंजीचे प्रश्न सुटणे माझ्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे योग्य निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लक्षवेधी लढतींमध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आता इचलकरंजीचे नवे आमदार बनले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य घेत त्यांनी या विजयावर आपले नाव कोरले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details