महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राधानगरीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलेले, आत्महत्या नैराश्येतूनच - Police revile Radhanagari suicide case

कसबा तारळे गावातील कौसर नासिर नायकवडी या तरुणीचा रविवारी 8 डिसेंबर रोजी जवळच असलेल्या एका मंदिरामध्ये गळफासाने मृत्यू झाला होता. कौसरने वाढदिवसादिवशीच आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. तरुणीच्या उत्तरीय तपासणीनंतर आणि पोलीस तपासात तरुणीने नैराश्येतूनच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Police revile Radhanagari suicide case
राधानगरी तरुणीच्या मृत्यूचे गुढ उकलेले

By

Published : Dec 10, 2019, 10:06 PM IST

कोल्हापूर- राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे गावात तरुणीचा रविवारी (दि.8) गळफासाने मृत्यू झाला होता. एका मंदिरामध्ये गळफास घेतल्याच्या स्थितीत तिचा मृतदेह मिळाला होता. कौसर नासिर नायकवडी, असे तरुणीचे नाव आहे. कौसरने वाढदिवसादिवशीच आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. पण ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे युवतीच्या नातेवाईकांनी म्हटले होते. त्यानुसार तरुणीच्या उत्तरीय तपासणीनंतर आणि पोलीस तपासात तरुणीने नैराश्येतूनच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पण कुटुंबीयांनी मात्र खुनाचा गुन्हा दाखल करा याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत असून संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख

दरम्यान, कौसरने आपला वाढदिवस जवळच असलेल्या मंदिरात तिच्या मित्र, मैत्रिणींच्या सोबत साजरा केला होता. घरीसुद्धा नातेवाईक मिळून वाढदिवस साजरा करणार असल्याने तिला सकाळीच घरातून बाहेर जाऊ नको, असे कुटुंबीयांनी सांगितले होते. पण ती मैत्र, मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करायला बाहेर गेली. पण घरी यायला उशीर झाल्याने आईने रागावून कौसरला फोन करून लवकर घरी यायला सांगितले आणि याच नैराश्येतून तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details