महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Female Police Physical Comfort : पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्याकडे अधिकाऱ्याची शरीरसुखाची मागणी

पोलीस ठाण्यातच महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे (Police female employee) एका अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी (Demand For Physical Comfort ) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने महिला कॉन्स्टेबलकडे ही मागणी केली. याप्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याने (Complaint by a female police officer) पोलीस अधीक्षकांकडे (Complaint to Superintendent of Police) याबाबत कारवाईची मागणी केली आहे. या घडलेल्या घटनेनंतर पोलीस दलाच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

Demand For Physical Comfort
महिला कर्मचाऱ्याकडे अधिकाऱ्याची शरीरसुखाची मागणी

By

Published : Dec 16, 2022, 7:03 PM IST

कोल्हापूर : दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून संबंधित महिला (Police female employee) पन्हाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मात्र इथे असलेल्या एका अधिकाऱ्याने संबंधित महिला कर्मचाऱ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी (Demand For Physical Comfort) केली आहे. या मागणीला संबंधित महिलेने (Complaint by a female police officer) न विरोध करत संबंधित पोलीस अधिकाऱ्याची अधिक्षकांकडे तक्रार (Complaint to Superintendent of Police) केली आहे. या घटनेने पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याची चर्चा होत असली तरी कोणताही पोलीस मीडियासोबत उघडपणे बोलायला तयार नाही.

गैरफायदा घेण्याचा प्रयत्न :संबंधित पोलीस अधिकारी वारंवार महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करतात. तसेच दररोज मॉर्निंग वॉक नंतर पोलीस ठाण्यात शॉर्ट घालून येतात आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात.

पोलीस अधीक्षकांकडून गंभीर दखल :याला न थारा देता संबंधित महिला कर्मचाऱ्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले असून याबाबत तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षकांनी सुद्धा या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details