महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विवाहित प्रेयसीची प्रियकराने केली गळा आवळून हत्या; २४ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या - कोडोली महिला खून

दोन दिवसांपूर्वी विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत संशयास्पदरित्या तरंगताना आढळला होता. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी प्रियकराला अटक केली. नागेश या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. कोडोली पोलिसांनी केवळ 24 तासात हत्येचा छडा लावला.

कोडोली पोलीस
कोडोली पोलीस

By

Published : Nov 6, 2020, 10:21 AM IST

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे दोन दिवसांपूर्वी विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत संशयास्पदरित्या तरंगताना आढळला होता. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी प्रियकर नागेश पाटील याला अटक केली असून नागेशने हत्या केल्याचे उघड झाले आहे. कोडोली पोलिसांनी केवळ 24 तासात हत्येचा तपास लावला.

आवळी येथील महिला हत्येप्रकरणी आरोपीला अटक

पन्हाळा तालुक्यातील आवळी गावातील सविता संजय पाटील ही रविवार 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर गेली. घरच्यांनी शेाधाशोध केली. त्यानंतर पती संजय गणपती पाटील याने कोडोली पोलिसात तक्रार दिली. बुधवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी घरासमोरील विहीरीत तिचा मृतदेह सापडला. वैद्यकीय अहवालानुसार सविताची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित पती संजय पाटील यांच्यासह अन्य दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केल्यानंतर सविताचा प्रियकर नागेश याने तिला रविवार सायंकाळी घराबाहेर बोलावले होते. त्यानंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली. घराजवळील विहिरीत स्वत:च्या खांद्यावरून नेऊन टाकल्याचे आरोपीने कबुल केले आहे.

अनैतिक संबंधातून कृत्य -

सविताचे आरोपी नागेश याच्यासोबत गेल्या 9 वर्षापासून अनैतिक संबध होते. नागेश हा तिच्या गावातीलच आहे. सविताचे आणखी दोघांशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नागेशने हे कृत्य केल्याचे व कबुली आरोपीने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details