कोल्हापूर- शहरात पहिल्या दिवशी संचारबंदीचा फज्जा उडाल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केवळ अत्यावश्यक व परवानगी असणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येत आहे. शहरातील जवळपास ३० ठिकाणी ही कारवाई सुरू आहे.
कोल्हापूरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई
कोल्हापुरातील प्रत्येक चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. शिवाय त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी करत, परवानगी असेल तरच शहरात प्रवेश दिला जात आहे.
कोल्हापूर संचारबंदी
शहरात अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र होते. अशा वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याचा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहे. त्यानुसार प्रत्येक चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. शिवाय त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी करत, परवानगी असेल तरच शहरात प्रवेश दिला जात आहे.
Last Updated : Apr 16, 2021, 3:27 PM IST