कोल्हापूर : आजकाल प्रत्येकालाच कॅमेराची आणि फोटोग्राफीची आवड आहे. याशिवाय अनेकांकडे त्यांचा खासगी कॅमेरा असल्याचे देखील पाहायला मिळतात. मात्र, बेळगाव जिल्ह्यातील एक व्यक्तीला कॅमेराची जितकी आवड आहे, तितकी कदाचित कोणालाही नसेल. या फोटोग्राफरला फोटोग्राफीची इतकी आवड की, त्यांनी आपल्या घराला देखील कॅमेराचे रूप दिले आहे. इतकेच नाही तर आपल्या मुलांची नावे देखील कॅमेराप्रमाणे कॅनॉन, निकॉन आणि इपसॉन अशी ठेवली आहेत.
कर्नाटकातील बेळगाव येथी रवी होंगळ हे परिसरातील प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. मागील अनेक वर्षांपासून फोटोग्राफी हाच त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांनी स्वतःला इतके समर्पित केले आहे की, प्रत्येक गोष्टीत त्यांना कॅमेरा डोळ्यासमोर येतो. आता हेच पहा ना, त्यांनी आपल्या तिन्ही मुलांची नावे सुद्धा कॅमेरा कंपनीप्रमाणे ठेवली आहेत. मोठ्याचे नाव कॅनॉन, मधल्याचे निकॉन आणि सर्वात छोट्या मुललाचे इपसॉन, अशी नावे त्यांनी ठेवली आहेत. रवी होंगळ यांना एक मुलगी सुद्धा हवी होती, पण ती होऊ शकली नाही. मात्र, तसे झाले असते तर तिचं नाव सुद्धा त्यांनी ठरवून ठेवले होते.
हेही वाचा...मोदीजी देश तुमच्यासोबत... पण सत्य काय आहे सांगा; राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल