महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बँक ग्राहकांना उभे राहावे लागतेय पावसात; तत्काळ शेडची व्यवस्था करण्याची मागणी - कोल्हापूर पाऊस बातमी

पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधील बँक ऑफ इंडियासमोर नागरिकांना पावसातच रांगा लावून उभे रहावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बँकांनी ग्राहकांसाठी पत्रा शेड किंवा मंडपाची उभारणी केली आहे. त्याचपद्धतीने या बँकेबाहेरही पत्राशेड उभारावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

बँकांबाहेर पहलेली गर्दी
बँकांबाहेर पहलेली गर्दी

By

Published : Sep 24, 2020, 4:21 PM IST

कोल्हापूर -पन्हाळा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या कोतोलीमधील बँक ऑफ इंडियामध्ये दररोज लाखोंची उलाढाल होत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना बँकेसमोर शेडसुद्धा नसल्याने बँकेविरोधात तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी नागरिकांना पावसात उभे राहावे लागत आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बँकांनी बँकेबाहेर ग्राहकांची योग्य पद्धतीने सोय केली असता कोतोली शाखेने घातलेला मंडप पुन्हा काढला असून निदान मंडप तरी घालून नागरिकांची होणारी गैरसोय थांबावावी, अशी मागणी होत आहे.

बँकेबाहेर उभारलेले ग्राहक

कोतीलीमध्ये आजपर्यंत कोरोनाचे 100हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर मृत्यूंची संख्यासुद्धा खूप आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात यावी म्हणून बाजारपेठ काही दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली होती. येथील स्थानिक लोकप्रतिनीधी आणि ग्रामपंचायतीने सुद्धा विविध उपाययोजना केल्या आहेत. येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेने सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली असून नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. मात्र, एकीकडे सोशल डिस्टन्सबाबत सूचना देत असताना नागरिकांना ऊन आणि पावसाचा सामना करावा लागू नये यासाठी शेडची तरी व्यवस्था करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांनी बँकेबाहेर मंडप घटल्याची उदाहरणे आहेत. कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये नागरिक बँकेबाहेर पावसात उभे आहेत. त्यामुळे हक्काच्या पैशांसाठी आम्हाला अशी गैरसोय का असा सवाल नागरिक करत आहेत.

दरम्यान, बँकेचे प्रबंधक चंद्रकांत कुंभार यांच्याशी बातचीत केली असता याबाबत लक्ष देऊन तत्काळ मंडप घालण्याची व्यवस्था करणार असून कायमस्वरूपी शेड बाबत सुद्धा पाठपुरावा सुरू लवकरच ते पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेकडून शक्य तितकी सर्व काळजी घेतली जात आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत सूचना सुद्धा दिल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांनी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेऊन सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. वारंवार सूचना देऊनही याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

या बँकेबद्दल आणि मॅनेजमेंटबद्दल सर्व स्तरातील लोकांच्या तक्रारी आहेत. किरकोळ गोष्टीसाठी लोकांना परत पाठवणे, लोकांशी उद्धट वागणे, माहिती घेण्यासाठी किंवा इतर कामासाठी आलेल्या लोकांना सुद्धा ताटकळत ठेवणे अशा बऱ्याच तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अमर बचाटे म्हणाले.

हेही वाचा -स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा 25 सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये होणार सामील

ABOUT THE AUTHOR

...view details