महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 15, 2021, 7:08 PM IST

Updated : Mar 15, 2021, 7:17 PM IST

ETV Bharat / state

जगदंबा तलवार भारतात आणावी या मागणीसाठी कोल्हापूरचे शिवभक्त घुसले क्रिकेट मैदानात

जगदंबा तलवार भारतात परत आणावी या मागणीसाठी शिवभक्त आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरच्या हर्षल सुर्वे यांसह तीन जण आज (दि. 15 मार्च) थेट पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भगवा ध्वज भडकवत आंदोलन केले

people from Kolhapur enter the cricket ground in Pune for demanding that Jagdamba sword be brought to India
शिवभक्त

कोल्हापूर - जगदंबा तलवार भारतात परत आणावी या मागणीसाठी शिवभक्त आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरच्या हर्षल सुर्वे यांसह तीन जण आज (दि. 15 मार्च) थेट पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भगवा ध्वज भडकवत आंदोलन केले. पुण्यातील याच मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. म्हणूनच इंग्लंडच्या राणीपर्यंत जगदंबा तलवारीचा विषय पोहोचवण्यासाठी हे आंदोलन केले असून याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तळेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडच्या संघाला महाराष्ट्रात सामना खेळू देणार नसल्याचाही इशारा देण्यात आला आहे.

जगदंबा तलवार भारतात आणावी या मागणीसाठी कोल्हापूरचे शिवभक्त घुसले क्रिकेट मैदानात

काय आहे नेमकं प्रकरण ?

छत्रपती शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक प्रमुख तलवार करवीर छत्रपती घराण्याकडे होती. त्याचे जगदंबा तलवार, असे नाव होते. सध्या इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या 'रॉयल कलेक्शन ट्रस्ट'या ठिकाणी सेंट जेम्स पॅलेस येथे ही तलवार ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अकरा वर्षांचे असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला होता. सन 1875-76 मध्ये त्यांना हीच जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होती. हीच इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी शिवभक्तांची भावना आहे. त्यासाठीच आता शिवभक्त आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापुरात रास्तारोको करत आंदोलन करण्यात आले होते. आता हाच विषय इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचावा म्हणून ज्या ठिकाणी इंग्लंड आणि भारत दोघांमध्ये क्रिकेट सामना होणार आहे, त्या मैदानावरच भगवा ध्वज फडकवत आंदोलन करण्यात आले आहे. शिवाय येत्या 23 मार्चला होणाऱ्या क्रिकेट सामन्यातही इंग्लंडच्या टीमला विरोध करणार असल्याचा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे.

मैदान उकरण्याचा करणार होते प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, भगवा ध्वज घेऊन मैदानात घुसलेले तीन शिवभक्त मैदानच उकरणार होते. सामन्याला कशा पद्धतीने अडथळा येऊ शकतो आणि हा विषय इंग्लंडमधल्या राणीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी हे आक्रमक आंदोलन करण्यात आले. मात्र ,तत्काळ या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -गोकुळ निवडणूक: महाविकास आघाडीबद्दल माहिती नाही, पण आम्हीही ताकद दाखवू

हेही वाचा -जगदंबा तलवार भारतात आणावी; शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने रास्तारोको

Last Updated : Mar 15, 2021, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details