कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला आज न्यायालयात हजर केले गेले. त्याला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
पानसरे हत्या प्रकरण : नववा संशयित आरोपी शरद कळसकरच्या कोठडीत 24 जूनपर्यंत वाढ पानसरे हत्येत कोल्हापूरच्या व्यक्तीचा हात असल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. तर पिस्तूल बनवून कळस्कर कोल्हापूरमध्ये घेऊन आला, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. शिवाय नवीन आरोपी निष्पन्न झाला आहे, त्याचे सुद्धा कळसकर फक्त वर्णन सांगत आहे. पण, त्या नवीन आरोपीचे नाव सांगत नसल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे त्याच्याकडून अधिक तपासासाठी पुढच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली असता त्याला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणामध्ये कळसकरने हत्येपूर्वी कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. त्याला 11 जून रोजी कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून यावेळी पुन्हा नवीन माहिती समोर येत आहे. एक नवीन आरोपी निष्पन्न झाला आहे त्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यासाठी आज न्यायालयाने कळसकरच्या कोठडीत वाढ केली आहे.
आज पर्यंत गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे :
1) समीर विष्णू गायकवाड
2) वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे
3) विनय बाबुराव पोवार (फरारी)
4) सारंग दिलीप अकोळकर (फरारी)
5) अमोल अरविंद काळे
6) वासुदेव भगवान सूर्यवंशी
7) भरत जयवनच्या कुरणे
8) अमित रामचंद्र देगवेकर
9) शरद भाऊसाहेब कळसकर