कोल्हापूर- : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज ८ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी - SHEKHAR PATIL
काॅ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याची १४ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
कळसकरला ८ जूनला अटक झाली होती. झाल्यानंतर १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. १८ जून रोजी त्याला पून्हा २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवाली आहे.
शरद कळसकर चौकशीतून अनेक मुद्दे समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबतचा खुलासा अद्यापही तपासणी यंत्रणेकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे शरदला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे.