कोल्हापूर - पूर परिस्थिती पाहता कोल्हापूरमध्ये एनडीआरएफ'चे दोन पथक दाखल झाले आहेत. दुपारी तीन वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात एनडीआरएफ'च्या दोन पथकांनी हजेरी लावली. दरम्यान, हे एनडीआरएफचे पथक शिरोळ तालुक्यात व कोल्हापूर शहरात तैनात असणार आहे.
Kolhapur Rain - पंचगंगेने धोक्याची पाणीपातळी ओलांडली, एनडीआरएफ'चे पथक दाखल - kolhapur rain news
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रासह शहर परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या बारा तासांत पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. (2019)ची परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने 'एनडीआरएफ'च्या पथकाला पाचारण केले आहे.
![Kolhapur Rain - पंचगंगेने धोक्याची पाणीपातळी ओलांडली, एनडीआरएफ'चे पथक दाखल कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोक्याची पाणीपातळी ओलांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे एनडीआरएफ'चे पथक दाखल झाले आहे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12538445-207-12538445-1626951868577.jpg)
यापूर्वीच 'एनडीआरएफ'च्या पथकाला पाचारण
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रासह शहर परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या बारा तासांत पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी चाळीस फुटांवर पोहचली आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 ची परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच 'एनडीआरएफ'चे पथक पाचारण केले होते. दरम्यान, आज सकाळी सात वाजता एनडीआरएफ'चे पथक पुण्यातून निघाले होते, ते दुपारी तीन वाजता कोल्हापूरमध्ये पोहचले आहे.