कोल्हापूर - कोल्हापुरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणीपातळी वाढत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सुद्धा 37 फुटांपेक्षाही जास्त झाली असून काही तासांतच इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
पंचगंगा नदी पुन्हा धोका पातळीकडे, 95 बंधारे पाण्याखाली
गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्यापर्यंत पंचगंगा नदीची धोका पातळीसुद्धा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत.
गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांचा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास 95 पेक्षाही अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर, अनेक वाहतूक मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहेत. सध्या राधानगरी धरणातून ६००० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदी ही पंचगंगा नदीला येऊन मिळते. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत सहा फुटांनी वाढ झाली आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिल्यास उद्यापर्यंत पंचगंगा नदीची धोका पातळीसुद्धा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यात एनडीआरफची पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, पुन्हा महापुराचा धोका ओळखून अलमट्टी धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सद्यस्थितीत 2 लाख 20 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग या धरणातून सुरू आहे. त्यामुळे काहीअंशी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला दिलासा म्हणावा लागणार आहे.