कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 एप्रिलपासून राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय जिल्हाबंदी सुद्धा करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार अत्यावश्यक कारणांसाठी नागरिकांना ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 617 नागरिकांनी ई-पासची मागणी केली होती. त्यातील केवळ 281 नागरिकांनाच ई-पास देण्यात आला आहे.
ई-पास संदर्भातील प्राप्त अहवालावर नजर -
- ई-पाससाठी मागणी केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 617
- ई-पास मागणी नाकारलेली संख्या - 1 हजार 332
- मंजूर झालेले ई-पास - 281
- मंजूर पण वैधता संपलेले पास - 4
ई-पास मिळविण्यासाठी काय करावे ?
- ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in// या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- त्यानंतर 'apply for pass here' या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
- आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही नमूद करावे.
- कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
- पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
- या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
- प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.