कोल्हापूर- गेल्या अनेक महिन्यांपासून श्री अंबाबाई मंदिरासह राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे, त्यावर अवलंबून असणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला आहे. श्री अंबाबाई देवीचे मंदिर सुरू करण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्य सरकारकडे केली.
श्री अंबाबाई मंदिर सुरू करा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मागणी
मंदिरे सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. भाजी मार्केट, मॉल, दुकाने, मद्य विक्री सुरू असताना मंदिरे बंद का? असा सवाल अनेक भक्त करत आहेत. असे जाधव म्हणाले.
श्री अंबाबाई मंदिर
मंदिरे सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. भाजी मार्केट, मॉल, दुकाने, मद्य विक्री सुरू असताना मंदिरे बंद का? असा सवाल अनेक भक्त करत आहेत. नियम आणि अटी घालून सरकारने निर्णय घेतला तर चुकीचे ठरणार नाही. सरकार जो निर्णय घेणार त्याची अंमलबजावणी आम्ही करू. त्यासाठी आंदोलन करणार नाही, असेही जाधव म्हणाले.
हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच खेळले जात आहेत गौरीचे खेळ