कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 87 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 17 रुग्ण सध्या आपल्या घरामधूनच उपचार घेत आहेत, तर उरलेल्या 70 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -नव वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना राधानगरी परिसरात ३ दिवस प्रवेश बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत गेला त्यानुसार तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. एकट्या कोल्हापूर शहरात पंधराहून अधिक सेंटर होते. मात्र, जसजशी रुग्णांची संख्या कमी होत गेली, तसे काही सेंटर वगळता बहुतांश सेंटर बंद करण्यात आले. भविष्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर यातील काही कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. सध्या कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
87 रुग्ण कुठे उपचार घेत आहेत यावर एक नजर -
1) सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर - 16 रुग्णांवर उपचार सुरू 2) अॅस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर - 11 रुग्णांवर उपचार सुरू 3) कुंजवन जैन मंदिर, कोविड केअर सेंटर जयसिंगपूर - 8 रुग्णांवर उपचार सुरू 4) आजरा कोविड केअर सेंटर, आजरा - 6 रुग्णांवर उपचार सुरू 5) आयसोलेशन हॉस्पिटल, कोल्हापूर - 5 रुग्णांवर उपचार सुरू 6) डायमंड हॉस्पिटल, कोल्हापूर - 5 रुग्णांवर उपचार सुरू 7) अॅप्पल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर - 3 रुग्णांवर उपचार सुरू 8) अथायू हॉस्पिटल, कोल्हापूर - 2 रुग्णांवर उपचार सुरू 9) सिद्धिविनायक हॉस्पिटल, कोल्हापूर - 2 रुग्णांवर उपचार सुरू 10) साई कार्डियाक सेंटर, कोल्हापूर - 2 रुग्णांवर उपचार सुरू 11) राजोपाध्ये नगर, कोल्हापूर - 3 रुग्णांवर उपचार सुरू 12) आयजीएम हॉस्पिटल, इचलकरंजी - 1 रुग्णावर उपचार सुरू 13) डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर - 1 रुग्णावर उपचार सुरू 14) गडहिंग्लज कोविड केअर सेंटर - 1 रुग्णावर उपचार सुरू 15) कागल कोविड केअर सेंटर - 1 रुग्णावर उपचार सुरू 16) ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर, गारगोटी - 1 रुग्णावर उपचार सुरू 17) सूर्या हॉस्पिटल, कोल्हापूर - 1 रुग्णावर उपचार सुरू, उरलेले 17 रुग्ण घरून उपचार घेत आहेत.