कोल्हापूर- शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूची लेन केली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. रात्री पाण्याची पातळी वाढल्यास आणि आवश्यकता भासल्यास महामार्गाच्या दोन्ही लेन बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कोल्हापुरात संततधार : पुणे-बंगळुरु महामार्गावर पंचगंगेचे पाणी, एकेरी वाहतूक सुरू - पार्किंग
पंचगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूची लेन केली बंद करण्यात आली आहे.
रात्री पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे, सातारा, बेळगाव, या ठिकाणीच अवजड वाहतूक थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावरील वाहन चालकांना महामार्ग सोडून धाबे, हॉटेल आदी सुरक्षित ठिकाणी आपली वाहने पार्किंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच राष्ट्रीय महामार्ग 4 वरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आज रात्री व उद्या दिवसा महामार्ग सुरू झाल्याची खात्री करूनच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महामार्गाची पाहणी करून प्रशासनातर्फे प्रवाशांना सूचना दिल्या.