कोल्हापूर - जिल्ह्यात असे एक गाव आहे. ज्या गावात वर्षानुवर्षे दिवाळीच साजरी होत नाही. हो हे खरं आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली असे या गावचे नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून गावात दिवाळी ऐवजी एका महिन्यानंतर देव दीपावली साजरी करतात.
हे आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली एक छोटे गाव. गावात गाडाईदेवीचे एक जागृत देवस्थान आहे. आजपासून पुढचे दोन दिवस याठिकाणी गाडाईदेवीच्या यात्रेला म्हणजेच देव दीपावलीला सुरुवात झाली आहे. या दिवाळीला धाकटी दिवाळी सुध्दा म्हंटले जाते. खरंतर गाडईदेवी महिषासूर मर्दिनीचा अवतार असून सुवासिनींची पाठराखण म्हणून सुद्धा या देवीला ओळखले जाते. त्यामुळे याच यात्रेच्या दिवशी इथले ग्रामस्थ दिवाळी साजरी करतात. विशेष म्हणजे सर्वच सुवासिनी या दिवाळीनिमित्त कोलोली गावाला येत असतात.
कोल्हापुरातील कोलोली साजरी होते देव दिवाळी महिन्याभरापूर्वी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. पण या कोलोली गावात आजपर्यंत कधीही दिवाळी साजरी झाली नाहीये. दिवाळीनंतर एक महिन्यांनी येणाऱ्या अमावस्येला मात्र गावात एक यात्रा साजरी होते. या यात्रेला देव दीपावली असे इथले नागरिक म्हणतात. या दिवशी दिवाळीपेक्षाही आनंदात आणि उत्साहात ही देव दीपावली इथले ग्रामस्थ साजरी करतात.
या देव दीपावलीनिमित्त गावात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच गावात मोठी जत्राही भरते. लहान मुलांसाठी पाळणे, खेळण्यांची, खाऊची दुकाने अगदी खचाखच भारतात. गावातील अनेकजण गावाबाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. मात्र, देव दीपावली म्हणजेच गाडाईदेवीच्या यात्रेला हे सर्व जण गावात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये अशा प्रकारे कोलोली गावात देव दीपावली साजरी करत असून. दीपावलीनंतर 1 महिन्यांनी दिवाळी साजरी करण्याची परंपरा गावानं जपली आहे.