कोल्हापूर -जिल्ह्यातील धामणे गावात भावानेच चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घटली आहे. शिवाजी सावंत असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून संजय सावंत असे आरोपीचे नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून हत्या केल्यानंतर संशयित संजय आणि त्याच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
कोल्हापूर : जमिनीच्या वादातून चुलत भावाची हत्या, मुलासह आईची पोलिसांपुढे शरणागती - कोल्हापुरात चुलत भावाकडून भावाची हत्या
कोल्हापूर जिल्ह्यातील धामणे गावात एकाने जमिनीच्या वादातून चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घटली आहे.
सावंत परिवारात १ एकर १४ गुंठे जमिनीसाठी गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असून हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजी यांच्या जागेतील संजय माने यांनी झाडे तोडल्याने वाद झाला होता. याचा राग संजय यांना होता. आज सकाळच्या सुमारास शिवाजी हे आपल्या म्हशीला घेऊन शेताकडे गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या संजय यांनी शिवाजी यांच्या डोळ्यात चटणी टाकली. बेसावध असलेले शिवाजी खाली कोसळले. यावेळी संजय याने धारदार शस्त्राने शिवाजी यांच्या छातीवर वार केले. वार वर्मी बसल्याने शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी संजय माने यांची आई पारूबाई महादेव सावंत (70 रा.धामणे) या उपस्थित होत्या. मात्र, त्याच्या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही, हे तपासात निष्पन्न होईल. हल्ल्यानंतर संजयने गावात जाऊन शिवाजीने माझ्यावर हल्ला केला, असा आरडाओरड केला. त्यानंतर आपल्या आईसोबत आजरा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
हेही वाचा -नाशिकमध्ये रक्ताची टंचाई; थॅलेसेमियाच्या रुग्णांची होत आहे परवड..