कोल्हापूर- सीपीआरमध्ये आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईहून कर्नाटकातील हसनकडे जात असताना किनी टोल नाका येथे 17 एप्रिलला 30 जणांना अडवण्यात आले होते. त्यातील सर्वांची तपासणी करण्यात आल्यानंतर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापुरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात पाच कोरोनाबधितांवर उपचार सुरू
आज सकाळी 9 च्या दरम्यान सीपीआर रुग्णालय प्रशासनाला एकूण 10 अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोनाबाधित रुग्ण कंटेनर चालक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, काल नुकतेच कोल्हापूरच्या पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज दिला होता. त्यामुळे, कोल्हापूरकरांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी होती.
आज सकाळी 9 च्या दरम्यान सीपीआर रुग्णालय प्रशासनाला एकूण 10 अहवाल प्राप्त झाले. त्यातील एक पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोनाबधित रुग्ण कंटेनर चालक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, काल नुकतेच कोल्हापूरच्या पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज दिला होता. त्यामुळे, कोल्हापूरकरांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी होती.
आता सीपीआरमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरातील सीपीआरमध्ये आतापर्यंत 7 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील भक्तीपूजा नगरमधील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या कोल्हापुरात एकूण 5 कोरोनाबधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.