महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरातील आणखी एकजण कोरोना मुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात दिला डिस्चार्ज - kolhapur corona latest news

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील या तरुणाला 9 एप्रिलला कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. 14 दिवसानंतर या तरुणाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज (रविवारी) कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या तरुणाला निरोप दिला.

कोल्हापूरातील आणखी एकजण कोरोना मुक्त
कोल्हापूरातील आणखी एकजण कोरोना मुक्त

By

Published : Apr 26, 2020, 3:25 PM IST

Updated : Apr 26, 2020, 4:02 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज (रविवारी) शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोनामुक्त तरुणाला येथील सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला. या तरुणाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाला. आज (रविवारी) दुपारी टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात त्याला घरी सोडण्यात आले. ही जिल्ह्यासाठी आणखी एक आनंददायी बातमी ठरली आहे.

कोल्हापुरातील आणखी एकजण कोरोना मुक्त

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील या तरुणाला 9 एप्रिलला कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. 14 दिवसानंतर या तरुणाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज (रविवारी) कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या तरुणाला निरोप दिला.

हेही वाचा -न्यायालयाच्या नोटीसनंतर रात्री १ वाजता आणणार 'त्या' तरुणाचा मृतदेह

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी या तरुणाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी या तरुणाला औषधे दिली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी डिस्चार्ज कार्ड वितरीत केले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

बावड्यातील महिलाही कोरोनामुक्त -

डॉ. गजभिये बावडा येथील वृद्ध महिलाही कोरोनामुक्त झाली आहे. 14 दिवसानंतरचे तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, तिला न्युमोनिया झाला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच तिलाही डिस्चार्ज दिला जाईल. उचत येथील आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या तरूणाच्या आईवरही उपचार सुरू आहेत. तिचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, तिचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. आठवड्यानंतर पुन्हा तिचा स्वॅब घेण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिलाही डिस्चार्ज देण्यात येईल, असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले.

Last Updated : Apr 26, 2020, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details