कोल्हापूर- आज नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस. करवीर निवासिनी अंबाबाई देवीची 'ओमकाररुपीणी' स्वरुपात पूजा बांधण्यात आली. दरवर्षी संपूर्ण देशभरातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रौत्सव काळातील विविध रुपांमधील पूजा पाहण्यासाठी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाही. त्यामुळे, भाविकांना ऑनलाइन माध्यमातूनच देवीचे हे देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवावे लागत आहे.
नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची 'ओमकाररुपिणी' स्वरुपात पूजा - Ambabai Omkarrupini
यावर्षीच्या नवरात्रौत्सवात करवीर निवासिनीचे करवीर माहात्म्यातील स्तोत्रांमध्ये होणारे दर्शन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून करवीर निवासिनीचे व्यापक आणि आदिशक्तीचे स्वरूपच वारंवार प्रकट होताना दिसते. आज 'ओमकाररुपिणी' स्वरुपाची पूजा बांधण्यात आली असून याद्वारे अंबाबाई व्यापक स्वरुपात विराजमान असल्याचे दिसते. आजची ही पूजा माधव मुनिश्वर आणि मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.
अंबाबाई
यावर्षीच्या नवरात्रौत्सवात करवीर निवासिनीचे करवीर महात्म्यातील स्तोत्रांमध्ये होणारे दर्शन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून करवीर निवासिनीचे व्यापक आणि आदिशक्तीचे स्वरूपच वारंवार प्रकट होताना दिसते. आज 'ओमकाररुपीणी' स्वरुपाची पूजा बांधण्यात आली असून याद्वारे अंबाबाई व्यापक स्वरुपात विराजमान असल्याचे दिसते. आजची ही पूजा माधव मुनिश्वर आणि मकरंद मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा-आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको