कोल्हापूर - चंदगड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध पतीला जिवंत पेटवून महिलेने स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कडलगे गावात संबंधित घटना असून पतीच्या आजारपणाला आणि शुश्रूषेला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. लक्ष्मण रवळू पाटील (वय 90 वर्षे) असे मृत पतीचे नाव असून पार्वती (वय 83 वर्ष) असे पत्नीचे नाव आहे.
लक्ष्मण पाटील यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पार्वती हिच्याशी विवाह केला होता. त्यांना 2 मुले आणि 5 मुली आहेत. दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही मुले गावातच दुसऱ्या ठिकाणी बांधलेल्या घरात राहतात.