कोल्हापूर:हातकणंगले तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती (Zilla Parishad Panchayat Samiti) मतदारसंघ बचाव कृती समितीने प्रभाग रचना करत असताना आर्थीक देवाण घेवाण झाल्याची तक्रार करत थेट या संदर्भात ईडीकडे तक्रार करण्याची प्रक्रिया (Citizen Preparing to lodge a complaint with ED) सुरु केली आहे. याबाबतच आज शेट्टी यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत स्वाभिमानी सुद्धा आक्रमक झाली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेमध्ये आर्थिक लालसेपोटी झालेली हेराफेरी व गंभीर चुका सुधारा याबाबतचे लेखी निवेदन आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांना देण्यात आले.
चुका सुधारण्यासाठी सूचना द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी यांनी म्हंटले आहे की, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांची रचना करत असताना तालुक्यातील काही राजकीय लोकांनी संबंधित विभागाचे तहसीलदार प्रांत या सर्वांना आपल्या कोल्हापूर येथील कार्यालय मध्ये बोलावून घेऊन आपल्याला हवा तसा नकाशा तयार करून त्यास जिल्हाधिकारी यांचेकडून मान्यता घेतल्या बाबतच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या.