महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्तव्यात कसूर करणाऱ्या २० लॅबना कोल्हापूर जिल्हा परिषदेने बजावल्या नोटीस - Lab Notice Zilla Parishad Kolhapur

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्ह्यासह राज्यातील 20 लॅबना कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेने नोटीस बजावल्या आहेत.

Lab Notice Zilla Parishad Kolhapur
कोल्हापूर जिल्हा परिषद नोटीस लॅब

By

Published : May 29, 2021, 7:01 PM IST

कोल्हापूर - कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्ह्यासह राज्यातील 20 लॅबना कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेने नोटीस बजावल्या आहेत. २५ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत आयसीएमआर पोर्टलवरील कोविड-१९ आरटीपीआरसीआरचे १ हजार ८७७ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टचे ३२२ कोविड रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा व राज्यातील इतर २० लॅबनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस बजावल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या नोटीस बजावल्या आहेत.

हेही वाचा -बिलं लाखोंची, पावती ९० हजारांची; पेठ वडगावच्या कुडाळकर हॉस्पिटलवर नातेवाईकांचा आरोप

रॅपिड अँटिजेन टेस्ट अंतर्गत कर्तव्यात कसूर केलेल्या लॅब पुढीलप्रमाणे -

यामध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट अंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर शिरोळ, केअर मल्टिस्पेशालिटी हातकणंगले, निदान पॅथालॉजी इचलकरंजी, जयसिंगपूरच्या अनुक्रमे, पायोस हॉस्पिटल, श्री साई लॅब, कोल्हापूरचे शिवतेज लॅब, पार्थ लॅब, देसाई पॅथालॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी, मृण्मयी लॅब, हेल्थ व्ह्यू या लॅबनी कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

आरटीपीसीआर अंतर्गत कर्तव्यात कसूर केलेल्या लॅब पुढीलप्रमाणे -

आरटीपीसीआर अंतर्गत कृष्णा डायग्नोस्टिक पुणे, डॉ. लाल पॅथालॉजी विमान नगर - पुणे, मेट्रो पोलीस हेल्थ केअर मुंबई, प्रिव्हेंन्टीन लाईफ केअर नवी मुंबई, थायरो केअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. नवी मुंबई, इन्फेक्शन लॅबोरेटरीज ठाणे, युडीसी सॅटेलाईट लॅबोरेटरी नवी मुंबई, सब अर्बन डायग्नोस्टिक पुणे आणि सदाशिव पेठ पुणे येथील अपोलो हेल्थ लाईफ स्टाईल या ९ लॅबनी त्यांच्याकडील कोविड रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल (IDSP) एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षास वेळेत आणि विहित नमुन्यात सादर न केल्याने जिल्ह्याच्या कोविड निर्देशांकामध्ये तफावत आल्याने त्यांना या नोटीस देण्यात आल्या आहेत. आपत्ती कायद्यांतर्गत व साथरोग कायद्यान्वये या दोषी लॅबवर पुढील कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा -तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना -जिल्हाधिकारी

ABOUT THE AUTHOR

...view details