कोल्हापूर -आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्राशिवाय कागदपत्रे नसणाऱ्या 18 वर्षांवरील लाभार्थ्यांनाही आता कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे. आज शुक्रवारी ज्यांच्याकडे अशी कागदपत्र नाहीत किंवा बेघर, भटके, फिरस्ती, मजूर, कामगार ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (Special Campaign for Corona Vaccination)
जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा -
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य संस्था यांच्यामार्फत ज्या नागरिकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतेही कागदपत्र नाही, अशा लाभार्थ्यांसाठी आज रात्री 9 पर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या डोस करता ऑन स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे ओळखपत्र नाही, अशा नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. शिवाय अधिक माहितीसाठी स्थानिक आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून माहिती घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Kolhapur heath administration)