कोल्हापूरNiwas Patil :अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम मंदिर निर्माण व्हावे यासाठी कोल्हापुरातील शिये गावच्या रामभक्ताने पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. 6 डिसेंबर 1992 रोजी प्रत्यक्ष कारसेवा करून बाबरीचा विवादित ढाचा पाडण्यात सहभाग असलेल्या या कारसेवकाने गेली 31 वर्ष अनवाणी पायानी प्रवास केला आहे. (Barefoot Travel) 22 जानेवारीला राम मंदिराची स्वप्नपूर्ती होणार आहे. या निमित्ताने या दिवशीच शिये ग्रामस्थांकडून नागरी सत्कार करुन पायात चप्पल घालण्यात येणार आहे. या स्वप्नपूर्तीमुळे आयुष्यातील अनमोल क्षण जगणार असल्याच्या भावना रामभक्त निवास पाटील यांनी व्यक्त केल्या. (Shiye Village)
'या' कारसेवकांनी दिलं होतं योगदान :अयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्यासाठी कोल्हापुरातून त्याकाळी काही कारसेवक थेट अयोध्येत गेले होते. यामध्ये करवीर तालुक्यातील शिये गावच्या 35 जणांचा समावेश होता. यामध्ये पांडुरंग पाटील, विलास बुवा, सुनिता बुवा, बाबासो चौगुले, शिवाजी बुवा, सुवर्णा बुवा, बाबासो बुवा, उत्तम पाटील, शिवाजी काशीद, आनंदा पाटील, संभाजी पाटील, विजय चौगुले, नारायण जाधव, प्रकाश जाधव, अण्णासाो पाटील, तानाजी भोगले, निवास जाधव, बाबासाहेब चव्हाण, भैरवनाथ जाधव, तानाजी नलवडे, शंकर पाटील, निवृत्ती गिरी, मधुकर सुतार महाराज, हनुमंत शिंदे, निवास पाटील यांच्यासह दिवंगत आनंदा शिंदे, बळवंत चौगुले, शारदा चौगुले, तातोबा पाटील, बाबुराव शिंदे, रामचंद्र शिंदे, सुनील कांबळे, नारायण शिंदे, बाळासो चौगुले, बाबुराव पाटील, महादेव पाटील, या गावकऱ्यांचा समावेश होता.